टोल नाक्यावर दोन ट्रक चालकांना चाकू दाखवत लुटले
चंद्रपूर (Chandrapur ) | घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील टोल प्लाझा ( Toll Plaza ) धानोरा फाट्याजवळील टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असलेल्या दोन ट्रकचालकांना अज्ञात आरोपींनी चाकू दाखवत लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्यांच्याकडून एकूण 7 हजार 700 रुपये हिसकावून नेले. ही घटना शनिवार, 5 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.
हे देखील वाचा:
|चंद्रपुर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा सोमवारपासून सुरु होणार
चालक धीरज वीरेंद्रप्रसाद यादवचंद्रपूर:- घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील टोल प्लाझा ( Toll Plaza ) धानोरा फाट्याजवळील टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असलेल्या दोन ट्रकचालकांना अज्ञात आरोपींनी चाकू दाखवत लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्यांच्याकडून एकूण 7 हजार 700 रुपये हिसकावून नेले. ही घटना शनिवार, 5 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.
चालक धीरज वीरेंद्रप्रसाद यादव (20, रा. बासघाट, जि. गोपालगंज, बिहार) हा शुक्रवारी ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 3342 ने लॉयड्स मेटल कंपनीतून राख भरून पांढरपौनी येथे गेला होता. सायंकाळी ट्रकखाली करून रात्री 8 वाजता धानोरा फाट्यावरील धाब्यावर त्याने जेवण केले. त्यानंतर रात्री 9 वाजता घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाट्याजवळी टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून झोपी गेले. दरम्यान, शनिवारच्या पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास चार अज्ञात आरोपी तेथे गेले व ट्रॅकचा दरवाजा खोलून आत शिरले. त्यानंतर चालक धीरज यादव याला चाकूचा धाव दाखवित लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्याच्याजवळी 3 हजार रुपये हिसकावून नेले.
तसेच चालक महेंद्रकुमार प्रेम शंकर हा ट्रक ने मालेगाव येथून सिमेंट घेऊन धरिवाल कंपनी येथे जात असताना त्याच टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून रात्री झोपी गेला होता. त्याच्याकडूनही आरोपींनी 4 हजार 700 रुपये हिसकावून नेले. याबाबत धीरज वीरेंद्र प्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिसांनी कलम 394 (34) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उप विभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, घुग्घुसचे पोलिस निरीक्षक बी. आर. पुसाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, घुग्घुसच्या सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे, संजय सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान श्वान पथकास व बोलाविण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले तपास करीत करीत आहे. (20, रा. बासघाट, जि. गोपालगंज, बिहार) हा शुक्रवारी ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 3342 ने लॉयड्स मेटल कंपनीतून राख भरून पांढरपौनी येथे गेला होता. सायंकाळी ट्रकखाली करून रात्री 8 वाजता धानोरा फाट्यावरील धाब्यावर त्याने जेवण केले. त्यानंतर रात्री 9 वाजता घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाट्याजवळी टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून झोपी गेले. दरम्यान, शनिवारच्या पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास चार अज्ञात आरोपी तेथे गेले व ट्रॅकचा दरवाजा खोलून आत शिरले. त्यानंतर चालक धीरज यादव याला चाकूचा धाव दाखवित लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्याच्याजवळी 3 हजार रुपये हिसकावून नेले.
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरी | गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार
तसेच चालक महेंद्रकुमार प्रेम शंकर हा ट्रक ने मालेगाव येथून सिमेंट घेऊन धरिवाल कंपनी येथे जात असताना त्याच टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून रात्री झोपी गेला होता. त्याच्याकडूनही आरोपींनी 4 हजार 700 रुपये हिसकावून नेले. याबाबत धीरज वीरेंद्र प्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिसांनी कलम 394 (34) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उप विभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, घुग्घुसचे पोलिस निरीक्षक बी. आर. पुसाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, घुग्घुसच्या सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे, संजय सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान श्वान पथकास व बोलाविण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले तपास करीत करीत आहे.