Accident: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू - Batmi Express

Accident: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,Accident,Accident News,Pune,Pune News,

Accident: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,Accident,Accident News,Pune,Pune News,

मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ( Tragic Accident ) पाच जणांचा जागीच मृत्यू ( Five people died on the spot ) झाल्याची अतिशय गंभीर घटना घडली आहे. हा अपघात ( accident ) इतका भीषण  होता की यामध्ये एका कारचा चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे (Shilatane ) गावाजवळ ही घटना घडली.

हे देखील वाचा:

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या! 

मिळालेल्या माहितीच्या अनुसार, ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. 

कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.