'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur Omicron: नागपूरात ओमायक्रॉन दुसरा बाधित रुग्ण आढळला; नागपुरकरांची चिंता वाढली - Batmi Express

0

Nagpur Omicron: नागपूरात ओमायक्रॉन दुसरा बाधित रुग्ण आढळला,Nagpur LIve News,Nagpur LIve,nagpur news,Nagpur Omycron,Nagpur,Nagpur Marathi News,

नागपूर (Nagpur) : राज्यात करोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना आता ओमिक्रॉनच्या जीवघेण्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूर शहरात  ( Nagpur Omycron ओमायक्रॉनच्या  दुसऱ्या बाधिताची नोंद करण्यात आली. दुबईतून आलेल्या या २१ वर्षीय युवकावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. ( Second omicron patient was found in Nagpur )

 (ads1)

काही दिवसांपूर्वी हा रुग्ण दुबईहून प्रवास करून नागपुरात दाखल झाला होता. या रुग्णाची करोना चाचणी  ( Nagpur Omycron  तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापू्र्वीच या रुग्णाला एम्समध्ये विलगीकरणात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी ओमायक्रॉनचा  ( Nagpur Omycron चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करून त्यांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.   First omicron patient was found in Nagpur )

 (ads1)

जिल्ह्यात सात बाधित
गुरुवारी जिल्ह्यात सात करोनाबाधितांची  ( Nagpur Omycron नोंद करण्यात आली. यात चार बाधित शहरात, तर तीन ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आले. जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ७०२ चाचण्या करण्यात आल्या. तर दिवसभरात दहा रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा पन्नासच्या खाली आली आहे. सध्या जिल्ह्यात ४९ सक्रिय रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्याबाहेरील पाच, शहरातील चार आणि ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×