Nagpur Omicron: नागपूरात पहिला ओमायक्रॉन रुग्ण सापडला - Batmi Express

Nagpur Omicron: नागपूरात पहिला ओमायक्रॉन रुग्ण सापडला ,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Omycron,Nagpur LIve News,

Nagpur Omicron: नागपूरात पहिला ओमायक्रॉन रुग्ण सापडला ,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Omycron,Nagpur LIve News,

नागपूर
:- आफ्रिकेतून नागपूरमध्ये आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Nagpur Omycron ) लागण झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा नागपुरातील हा पहिला रुग्ण आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (  First omicron patient was found in Nagpur )

 (ads1)

Read Also:  अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार 

मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने आता नागपूरमध्ये  ( Nagpur Omycron )  शिरकाव केला आहे. ५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला एम्समध्ये भरती करण्यात आले. ६ डिसेंबरला जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुने पाठविण्यात आले होते. त्या रुग्णाचा ओमायक्रोनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार दहाव्या दिवशी पुन्हा 'आरटीपीसीआर' तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात येईल. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबियांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.