चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२१ हि परीक्षा जानेवारी महिन्यापासून ऑफलाइन पध्दतीने होईल असे विद्यापीठाने जाहिर केले आहे. विद्यापीठातुन सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिक्षण प्रणाली अनेक दिवसांपासून आभासी पध्दतीने सुरु आहे. महाविद्यालय स्तरावर अभ्यासक्रम व शिकवनी हि संपूर्णपणे आभासी (ऑनलाइन) पध्दतीने सुरु आहे.
Read Also: चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे :- श्याम बोबडे
(ads1)
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुद्धा ऑनलाइन पध्दतीनेच होईल अशी आशा विद्यार्थ्यांना व पालक वर्गाला होती. कारण, विद्यापीठात शिकणारा बहुतांश विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातील आहे. या सोबतच विद्यापीठात जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील विद्यार्थी वर्ग सुद्धा शिक्षण घेत आहे. ऑफलाइन पध्दतीने परीक्षा झाल्यास ह्या सर्व विद्यार्थ्यांपुढे प्रवास करणे व वाढते प्रवासी भाडे, बससेवा बंद, वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा, होस्टल व्यवस्था ठप्प, मेस व्यवस्था ठप्प, आर्थिक नियोजन, निवासस्थान व्यवस्था करणे, कोविड-१९ मुळे उद्द्भवलेली परिस्थिती यासोबतच नविन कोविड-१९ वेरिएंट ओमिक्रोन हा महाराष्ट्रात शिरला आहे. यामुळे भीतीचे वातावरण सर्वत्र आहे.
( Gondwana Winter Exam Offline Session-2021-22 )
(ads1)
अनेक दिवसांपासून सुरु असलेले आभासी पद्धतीचे शिक्षण व ऑनलाइन शिकवनी यामुळे आता ऑफलाइन परीक्षेची तयारी कशा पध्दतीने करावी असाही प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे उभा आहे. सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्गासोबत चर्चा केली असता हा निर्णय विद्यापीठाने मागे घ्यावा व होणारी हिवाळी-२०२१ परीक्षा हि ऑनलाइन पध्दतीनेच घेण्यात यावी या मागणी सहित संपुर्ण विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांच्या वतीने यंग थिंकर्स चंद्रपुर एन.बी.एस.एस च्या चमु तर्फे दिनांक २३-१२-२०२१ ला जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब (निवासी) विशालकुमार मेश्राम यांना देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टीने वरील सर्व बाबींचा विचार करीत गोंडवाना विद्यापीठाशी योग्य चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय त्वरीत घ्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने निशिकांत आष्टनकर, शुभम निंबाळकर, आकाश वानखेडे, रोहन चालेकर व सचिन लांडगे उपस्थित होते.