ब्रेकिंग! मिग-21 फायटर जेट विमानाचा जैसेलमेरजवळ अपघात, पायलट विंग कमांडरचा मृत्यू - Batmi Express

मिग-21 फायटर जेट विमानाचा जैसेलमेरजवळ अपघात, पायलट विंग कमांडरचा मृत्यू,India News,IndiaNews,News India,Rajsthan,jaisalmer

मिग-21 फायटर जेट विमानाचा जैसेलमेरजवळ अपघात, पायलट विंग कमांडरचा मृत्यू,India News,IndiaNews,News India,Rajsthan,jaisalmer

भारतीय लष्कराचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. हवाई दलाच्या मिग-21 ( MiG-21 फायटर जेट क्रँश ) या विमानाचा राजस्थानमधील जैसलमेरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात  पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हांचा मृत्यू झाला आहे. जैसेलमेर पोलिसांनी या घटनेची पृष्टी दिली आहे. 
 (ads1)

जैसेलमेर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितलं की, सॅम ठाणा परिसरातील डेझर्ट नॅशनल पार्कच्या जवळ या विमानाचा अपघात झाला. आता या घटनेवर भारतीय हवाई दलाने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. भारतीय हवाई दलाने एक ट्वीट करत सांगितलं की, साडे आठ वाजता भारतीय हवाई दलाच्या मिग-21 या विमानाचा पश्चिम सेक्टरजवळ अपघात झाला आहे. या अपघाताच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

 (ads1)

या आधी तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी भारतीय लष्कराचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.