'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या :- आ. किशोर जोरगेवार

0

Gadchiroli News,Chandrapur News,Chandrapur,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Chandrapur Live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

चंद्रपूर
:- ओमायक्रोनचा वाढता धोका व बंद असलेली बससेवा लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना केली आहे. सदर मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Read Also: चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे :- श्याम बोबडे

 (ads1)

कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे सर्व महाविद्यालये बंद होती. मात्र शासन धोरणाप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस नियमित सुरु होते. आता कोरोनाचा प्रसार मंदावल्याने महविद्यालय नियमित सुरु झाले असले तरी अजूनही वसतिगृह सुरु झालेली नाहीत. त्यातच महाराष्ट्र परिवहन सेवा खंडित असल्यामुळे बाहेरगावी असलेले विद्यार्थी अद्यापही महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहिलेले नाही. अश्यातच आता विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 (ads1)

सद्यस्थितीत राज्यात कोरोना चा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असून बहुसंख्य विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही तसेच नियमित बससेवेचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बंद वसतिगृह आणि अपूर्ण लसीकरण या सारख्या समस्यांमुळे विद्यार्थांपुढे ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास अडचण निर्माण झालेली आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×