- वृत्त लेखक - सचिन मोहुर्ले ( बाळापूर )
बाळापूर ( नागभीड ) : 11डी. ते 17डी. 2021 सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम जनजागृती सप्ताह निमित्त गायमुख देवस्थान बाळापूर येथे अंगणवाडी सेविका तळोधी व अंगणवाडी सेविका बाळापूर व सेविका सुपर वायझर, उपस्थिती मध्ये आरोग्य माहिती देण्यात आले, त्या मध्ये असे सांगण्यात आले की, अंगणवाडी मधील सर्व बालकांची सिकलसेल चाचणी करणे तसेच बालकांचा मातांना सुद्धा तपासणी करणे आवश्यकता आहे.
(ads1)
Read Also: विद्याभूषण हायस्कूल बाळापूर येथे सिकलसेल आजार मार्गदर्शन
भविष्यात आपल्या कुटुंबात, शेजारी, समाजात सिकलसेल आजार वाढू नये, कारण सिकलसेल आजार हा अनुवांशिक आजार आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होणारा आजार आहे, हा आजार वाहक पती- वाहक पत्नी असल्यास दाम्पत्य पीडित जन्माला येतो, गरोदर मतांनी तीन महिन्याचा आत सीव्हीसी तपासणी शासकीय महाविद्यालय नागपूर येथे तपासणी करून घेने, पीडित दाम्पत्य असल्या मुळे दोन ते तीन महिन्यांनी रक्ताच्या कमतरते मुळे रक्त द्यावे लागत असते, या व्क्तीना सतत असह्य वेदना होतात, त्यामुळे आर्थिक स्तिती मध्ये बिघाड येते, मानसिक ताणतणाव निर्माण होतें.
(ads1)
Read Also: सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहास सुरुवात
त्यामुळे सतत चीड चीड कुटुंब असते, या पीडित वक्तीना नेहमी डॉ.कडे जाऊन स्वतःचा योग्य उपचार करून घेणे आवश्यक असते, अश्या व्क्तीने रोज प्लेन फॉलीक आसिड च्या गोळ्या खायला लावणे, योग्य पोषण आहार सेवन करणे पाणी खूप पिणे, यांना सद्देव निगराणीत ठेवणे, अति थंडी तसेच कडक ऊन या पासून बचाव करणे ई. माहिती देताना प्रा. आ. केंद्र बाळापूर सिकलसेल स्वयं सेवक सचिन मोहुर्ले यांनी दिले,
"सिकलसेल परिपूर्ण थांबविता येत नाही परंतु आपल्याला या आजारावर नियंत्रण आनन्याचा प्रयत्न करू शकतो,"
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.