भंडारा: भरलग्नात दोन मित्रांमध्ये लढाई; सपासप वार करत एकाची हत्या - Batmi Express

Be
0

murder,Bhandara,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara Batmya,Bhandara News,

भंडारा
:- महाराष्ट्रातील भंडारा याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका लग्नात एका तरुणाने एकेकाळच्या आपल्या जीवलग मित्राची हत्या केली आहे. एका लग्नात आरोपीनं मित्राला पाहिल्यानंतर जुना वाद पुन्हा उफळला. यामुळे दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, एका तरुणानं आपल्या मित्राची चाकुने सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
 (ads1)

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मैदू पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर उमेश सोनकुसरे असं आरोपीचं नाव आहे. हत्येच्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी उमेशला ताब्यात घेतलं आहे.

अन्य फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मृत मैदू आणि आरोपी उमेश हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. पण काही दिवसांपूर्वी कोणत्या तरी कारणातून त्यांच्यात वाद होऊन, मैत्रीचं रुपांतर दुष्मणीत झालं होतं. त्यामुळे दोन्ही गटात खुन्नस सुरू होती.

दरम्यान, मैदू आणि उमेश हे आपापल्या मित्रांसोबत अन्य एका मित्राच्या लग्नात आले होते. मित्राच्या लग्नात दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर त्यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून निघाला. यामुळे ऐन विवाहस्थळीच दोन गटात तुफान राडा झाला. याच वादातून उमेश सोनकुसरे यानं मैदूवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

 (ads1)

हा हल्ला इतका भयंकर होता की मैदू हा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मुख्य आरोपी उमेश सोनकुसरे याला ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->