बाळापूर ( नागभीड ) : आज दि. 11/12/21 ला रोजी शनिवार, सर्वोदय युवा विकास संस्था चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र बाळापूर अंतर्गत ग्राम पंचायत देवपयली येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा देवपयली येथील प्राध्यापक तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 11 दिसें. ते 17 दिसें 2021 सिकल सेल सप्ताह साजरा करण्यात आले त्या करिता सीकलसेल आजाराची माहिती देण्यात आली असता, सिकल सेल आजार संसर्ग जण्य आजार नसून तो अनुवंशी ( पिढ्यानपिढी ) आजार आहे, तसेच विवाह पूर्वी सिकल सेल आजाराची तपासणी करणे, पती पत्नी दोघेही एस - ए एस असल्यास बाळाची गर्भजल तपासणी करणे आवश्यक आहे.
(ads1)
Read Also: हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल
एस एस वक्ती असल्यास सतत डॉ. च्या सल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे, रक्ताची आवश्यकता भासल्यास सिकल सेल व्क्तीना मोफत सुविधा शासना कडून दिली जाते, तसेच या पीडित वक्ती ला शासना कडून 1000 रु महिना दिल्या जाते, अश्या प्रकारे माहिती देण्यात आली. नन्तर विद्यार्थी ची गावा मध्ये सिकल सेल सप्ताह जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली, प्रभात फेरी काढतांना सिकल सेल पॅम्प्लेट, पोस्टर, तसेच बॅनर व नारा :-
सिकल सेल जानुंया, सिकल सेल टाळूया ! लग्ना पूर्वी करून घ्या, सिकल सेल तपासणी
अश्या माध्यमातून गावा गल्लीत सिकल सेल सप्ताह जनजागृती करण्यात आली, सिकल सेल जनजागृती कार्यक्रम करत असताना सहकार्य म्हणून शिक्षक वृंद वाढई सर, निकुरे सर, जिभकाटे सर, कुंभारे उपस्थित होतें व तसेच प्रा. आ. केंद्र बाळापूर येथील सिकल सेल स्वयंसेवक - सचिन मोहुर्ले या सर्वांनी मोलाचा वेळ देऊन सिकल सेल सप्ताह जनजागृती देवपयली गावा मध्ये चांगल्या प्रकारे करण्यात आले.