'
30 seconds remaining
Skip Ad >

“आई तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”, अभिनेत्री मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल- Batmi Express

0

“आई तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”,National,IndiaNews,News India,Bollywood,Maharashtra,Mumbai,

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे प्रेमविवाहामुळे मुलीच्या आईनेच मुलाला हाताशी घेऊन तीचा खून केल्याची घटना घडली होती. यावर स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकीचं काम करणाऱ्या मिनाक्षी राठोडनं तिच्या आईला एक पत्र लिहीलंय. या पत्रातून तिने प्रेमविवाहाचा तसेच आंतरजातीय लग्नांचा राग बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या भावना लिहील्या आहेत. यामध्ये मिनाक्षी नेमकं काय म्हणाली आहे पाहुयात. 
  (ads1)

मिनाक्षीने नेमकं काय लिहिलंय? :

 काल परवा आपल्या लहान मुलीचं ही आंतजातीय लग्नं मोठ्या थाटात लावून दिलंस आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन रीत आहे हे सांगून दिलंस! हे स्विकाराचं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला ५ मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलंस! राग कसा गं कंट्रोल केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?

मोठ्या ताईचं Intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताईचा.  माझं कैलाश सोबत Intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!

काल परवा आपल्या लहान मुलीचं ही Intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं?

  (ads1)

आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस! राग कसा ग Control केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं? हे असच "कीर्ती थोरे "च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. 

तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! 

काल परवाच सकारात्मक वाटणारी, तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो स्वॅग तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांचे आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा स्वॅग खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!”

अभिनेत्री मिनाक्षी राठोडने या पोस्टसोबत किर्ती थोरेचा एक फोटो शेअर केलाय. सोबतच तिचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. मिनाक्षीने घरातील आंतरजातीय लग्न तिच्या आईने जेवढ्या खुलेपणाने स्वीकारली, त्यासाठी आईचं कौतुक केलंय. अभिनेत्री मिनाक्षी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×