गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या - Batmi Express

गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या,Batmi Express,Suicide Marathi News,suicide news,suicide,Sangli,Sangli News,

गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या,Batmi Express,Suicide Marathi News,suicide news,suicide,Sangli,Sangli News,

कुपवाड: एक प्रेमी युगुला जोडप्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कुपवाड येथे एका पत्र्याच्या शेड मध्ये विषारी औषध प्राशन करून एकाच साडीला दोघांनी गळफास घेऊन ही आत्महत्या केली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या आत्महत्येची नोंद झाली आहे. ( couple-commits-suicide-by-strangulation

 (ads1)

कुपवाड मधील जुना बुधगाव रोड वरील करनाळे मळ्यातील असणाऱ्या नांद्रेकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Read Also: एका तरुणासह दोन तरुणींची डोंगरावर जाऊन आत्महत्या 

कीटकनाशक विषारी औषध प्रशाना करून लोखंडी अँगलला एकाच साडीला  गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली आहे राजू महादेव माळी( वय ३५ रा.जुना बुधगाव रोड कुपवाड,मूळ गाव बब्लेश्वर.विजापुर) आणि  रीना किरण पार्लेकर (वय ३०रा.वखारभाग,मिरज) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

 (ads1)

घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर आत्महत्येच्या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह घेण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे, मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.दोन दिवसांपूर्वी तासगावच्या मणेराजुरी या ठिकाणी प्रेम प्रकरणातून दोन युवतींसह एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना,कुपवाड मध्ये पुन्हा एका प्रेमीयुगुलाची घडलेली आत्महत्या, त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.