एका तरुणासह दोन तरुणींची डोंगरावर जाऊन आत्महत्या - Batmi Express

Be
0

Suicide Marathi News,suicide news,suicide,Sangli,Sangli News,



सांगलीतासगाव तालुकयातील मणेराजुरी येथे तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.एका डोंगरावर एका युवकासह दोन युवतींचे मृतदेह आढळून आले आहेत.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.विषारी औषध पिऊन ही आत्महत्या केल्याचं समोर आला आहे,तर या मृतदेहांच्या जवळ चॉकलेट्स आणि  पुष्पगुच्छ आढळून आले आहेत.मात्र ही आत्महत्या ( Suicide ) नेमकी कोणत्या कारणातून झालेल्या स्पष्ट आहे. ( एका तरुणासह दोन तरुणींची डोंगरावर जाऊन आत्महत्या )

तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी येथील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एक युवक आणि दोन युवतींचा यामध्ये समावेश आहे. हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी ) असे युवकाचे नाव असून एक युवती ,मूळ गाव जयगव्हाण ता.कवठेमहांकाळ सध्या रा. मणेराजुरी) तर एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही.या तिघांच्या मृतदेहाजवळ द्राक्षबागेसाठी वापरले जाणारे विषारी औषधाची बाटली सापडली आहे.तसेच या मृतदेहा शेजारी

चाॅकलेट्स,पुष्पगुच्छ आणि हार आढळून आले आहेत. या घटनेमुळे तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.तर याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातुन अस्पष्ट आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->