वरणगावात महिला शक्ती कायद्याचे महिलांनी फटाके फोडून केले स्वागत - Batmi Express

वरणगावात महिला शक्ती कायद्याचे महिलांनी फटाके फोडून केले स्वागत,Jalgaon,Jalgaon News,Jalgaon Marathi News,Jalgaon Live,Jalgaon Today

वरणगावात महिला शक्ती कायद्याचे महिलांनी फटाके फोडून केले स्वागत,Jalgaon,Jalgaon News,Jalgaon Marathi News,Jalgaon Live,Jalgaon Today

 (ads1)

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज महिलांनी महिला शक्ती कायद्याचे फटाके फोडून व एकमेकींना पेढे भरवून आनंद व्यक्त करत जोरदार स्वागत केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये नारी शक्ति हा कायदा लागू करण्यात आलेला आहे ,त्यामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महिलांनी या कायद्याचे बस स्टॅन्ड चौकांमध्ये जोरदार स्वागत केले आहे.

Read Also: एगळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

 (ads1)

यावेळी फटाके फोडत व नारीशक्ती कायद्याचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकींना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे, यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमा तावडे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.