चंद्रपूर: प्रेमी युगुलाची झाडाला गळफास लावून आत्महत्या - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,suicide,suicide news,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,suicide news,suicide,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,


साकोली
: तालुक्यातील सुंदरी गावाच्या शेतशिवारात एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून कोमल वाघ रा.परसोडी वय १८ वर्षे व कमलेश राऊत रा.सुंदरी वय १७ वर्षे असे मृत प्रेमीयुगुलांचे नावे आहेत.

ही घटना शनिवारी दिनांक ४ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी सकाळी सुंदरी गावातील शेतात एकाच झाडाला गळफास घेतलेले व्यक्ती आढळले त्याची माहिती गावात वार्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली .या घटनेची माहिती साकोली पोलिस स्टेशनला देण्यात आली.पोलिसांच्या चौकशीनंतर दोघेही नम्रता ज्युनिअर कॉलेज मध्ये १२ व्या वर्गात शिकत होते.मृत्युचे कारण कळले नसुन प्रेमप्रकरणातुन ही घटना घडल्याचे समजते.पुढील तपास साकोली पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.