चंद्रपूर: डोंगरगाव परिसरात वाघाचा वावर, गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Live,Chandrapur Today
चंद्रपूर: डोंगरगाव परिसरात वाघाचा वावर

गोंडपिपरी
:- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव मार्गावर बुधवारला रात्रौच्या सुमारास वाघ दिसून आला. त्यामुळे डोंगर गाव परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर भाग हा धाबा वनपरिक्षेत्रात येतो. या जंगलात विविध प्राण्यांचा अधिवास आहे.लगतच असलेल्या कन्हाळगाव अभियारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरीण, यासह अन्य वन्यजीवांचा अधिवास आहे. अभियारन्यातून जंगल भ्रमंती करत वाघ डोंगरगाव मार्गावर आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा: ब्रम्हपुरी: चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये

अश्यातच बुधवारला रात्रोच्या सुमारास डोंगरगाव मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या डोंगरगाव परिसरात शेतीचे काम सुरू आहे. कापूस वेचणी, हरभरा पेरणी, यासह अन्य शेत कामाची लगबग सुरू आहे. आणि परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

वन्यजीव वनपरीक्षेत्राच्या बाहेर कधी मार्गावर तर कधी शेत शिवारात दिसुन येत असल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची दाट शयकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->