ब्रम्हपुरी: चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये - Batmi Express

ब्रम्हपुरी: चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये - Batmi Express,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur Live,Bramhapuri Liv
ब्रम्हपुरी: चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये - Batmi Express,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur Live,Bramhapuri Liv
चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये

हायलाइट्स

  • चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये
  • पुलवजा बंधाऱ्यासाठी १२ कोटी रूपयांचा निधी मंजूर

ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव-लाडज येथील वैनगंगा नदीवर पुलवजा बंधाऱ्याचे काम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी  राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी पंचायत समिती ब्रम्हपुरीचे माजी सभापती नेताजी मेश्राम, सुरबोडीचे माजी सरपंच हिरालाल ठेंगरे, पिंपळगाव (भो) चे माजी सरपंच सुनील धांडे, चिखलगावचे माजी सरपंच भास्कर नाकतोडे, सावलगावचे माजी सरपंच राजेश तलमले, पिंपळगावचे मंगल पिलेवान, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वामन मिसार, चिखलगावचे शामराव कुथे, ओमप्रकाश ढोरे, नेताजी नाकतोडे, विश्वनाथ राऊत, नामदेव नाकतोडे, गणेश सती मेश्राम, अमोल ठेंगरे, चरण खोब्रागडे, जयदेव ठेंगरे इत्यादी उपस्थित होते. 

चिखलगाव - लाडज पुल हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचा मुद्दा निवेदन देणाऱ्यांनी नामदार विजय वडेट्टीवार यांना पटवुन दिला. त्यानंतर त्यांनी पुलवजा बंधाऱ्यासाठी १२ कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून देणार असल्याची ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.