'
30 seconds remaining
Skip Ad >

Msrtc Strike: गोंदिया आगारातील 12 कामगारांचे निलंबन तर 19 कामगारांची सेवा समाप्त - Batmi Express

0

Msrtc Strike: गोंदिया/तिरोडा आगारातील 12 कामगारांचे निलंबन ,Gondia,Gondia Live News,gondia news,Gondia Marathi News,Msrtc Strike
Msrtc Strike: गोंदिया/तिरोडा आगारातील 12 कामगारांचे निलंबन 

गोंदिया
: राज्य शासनाने एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र, संपकरी कामगार आपल्या मागण्यावर ठाम असून गोंदिया आगारातील एकही चालक, वाहन कामावर परतलेला नाही. आज 29 नोव्हेंबर रोजी निलंबीत करण्यात आलेल्या भंडारा विभागातंर्गत सहा आगाराच्या 27 संपकर्‍यांसह आतापर्यंत 179 जणांचे निलंबन झाले आहे.  तर 86 अस्थायी कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आजपर्यंत तिरोडा आगारातील 1,गोंदिया आगारातील 11 कामगारांचे निलंबन तर 19 कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. 

हे नक्कीच वाचा: प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून

गोंदिया आगारातील सर्व वाहन व चालक संपावर असल्याने आगारातून सुटणार्‍या सर्वच फेर्‍या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागील 29 दिवसात आगाराचे 20 कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी दिली.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी 31 ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. 

निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई झाल्यानंतर तसेच वारंवार चर्चा करुनही तोडगा निघत नसल्याने शासनाने संपकरी कामगारांच्या परिवहन मंत्र्यांनी कामगाराच्या पगारात भरगच्छ वाढ देऊनही कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. प्रवासाची कोंडी वाढली आहे. 

राज्यातील काही आगारातील कर्मचारी आज कामावर परतले, काही भागात एसटीच्या फेर्‍या चालल्या. मात्र गोंदिया आगारातील कोणताच चालक-वाहक आजही कामावर परतलेला नाही. कार्यालयील अधिकारी, कर्मचारी वगळता सर्व 270 चालक-वाहक संपावर आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×