भंडारा - प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून - Batmi Express

भंडारा - प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून,murder,Bhandara,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara Batmya,Bhandara News,

भंडारा - प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून,murder,Bhandara,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara Batmya,Bhandara News,
 प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून

भंडारा
:- लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला तरुणीच्या घरच्यांनी नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तरुणावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिल्पा तेजराम फुल्लुके (वय 19) वर्ष रा. मऱ्हेगाव ता. लाखनी असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, नयन विश्वनाथ शहारे (वय 19) रा. पालांदूर असे आरोपीचे नाव आहे. शिल्पा ही पालांदूर येथील संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती..

हे नक्कीच वाचा: नागभीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

सोमवारी तिला पाहण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील पाहुणे येणार होते. त्यानिमित्ताने ती खरेदी करण्यासाठी घरून सकाळी 11 वाजता निघाली. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास तिचा पालांदूर-अड्याळ रस्त्यावरील स्माशभूमीजवळ मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ चाकू आणि विषाची बाटलीही सापडली. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. पालांदूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असता शिल्पाच्या डाव्या हाताची नस कापल्याने रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. चाकूचा वार खोलवर झाल्याने व नस कापली गेल्याने तिने स्वत: नस कापली नसावी, असा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिचे पालांदूर येथील एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याचे पुढे आले. तसेच आठ दिवसापुर्वी तो शिल्पाच्या घरी लग्नाची मागणी करण्यासाठी गेला होता. परंतु त्याला नकार दिल्याने त्याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आला असता दरम्यान आरोपी नयन शहारे याला ताब्यात घेतले। चौकशीअंती रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. 

चार-पाच वर्षापासून प्रेम असल्यामुळे व शिल्पाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने नयनने तिचा खून करण्याचा कट रचला. विशेष म्हणजे नयनने आज सकाळीच नवीन चाकू विकत घेतला होता. याच चाकूने शिल्पाच्या हाताची नस कापून तिचा खून केला. एवढेच नाही तर त्याने खून कसा करावा याबाबत व्हिडीओ बघितल्याचीही माहिती पुढे आली आहे. या घटनेचा तपास पालांदूर पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.