चंद्रपूर - वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी |
- आठवड्यातील चौथी घटना
- खरमत येथील शेतकरी जखमी
हे नक्कीच वाचा: नागभीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू
सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे. कापूस वेचणी व धान चुरण्याचे काम जोमाने सुरू आहे. आज दुपारी केशव रामटेके आपल्या शेतात शेतीचे काम करीत होता. शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून रामटेके यांना जखमी केले. बाजूला त्याचा मुलगा व शेतमजूर असल्याने त्यांनी आरडाओरडा केला त्यामुळे तो थोडक्यात बचावला. लगेच त्याला वैद्यकीय उपचारासाठी पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.