सावली - वैनगंगा नदी जवळ बोलेरो गाडी पल्लटली
सावली - सावली तालुक्यातील वैनगंगा सिमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाच्या कठडा तोडुन छत्तीसगड येथील मजुरांची बोलोरो गाडी पलटी घातली असुन त्यामध्ये 12 ते 15 जन जखमी झाले असून त्यामध्ये 5 जन गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सर्वाना काही लोकांनी मदत करून काढले व त्यांच्या समोरील उपचारासाठी सर्वाना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली भरती करण्यात आले आहे.
हे नक्कीच वाचा: नागभीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू
परंतु जखमी रूग्णाची नावे कळलेली नाही. हे सर्व जन चंद्रपूर येथे मजुरी साठी आलेले होते. ते छत्तीसगड राज्यात परत जात असताना आज पहाटेच्या दरम्यान हा अपघात झालेला असून अपघात भिषन झालेला असून याची माहिती सावली पोलीसांना देण्यात आलेली आहे.