चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कडक कारवाई |
चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनभरापासून माऊली एकता मीना बाजार सुरू आहे. मात्र, येथे राज्य शासनाने निर्देशित केलेल्या आणि महानगरपालिकेने सूचित केलेल्या कोरोणा-19 नियमांचे पूर्णपणे भंग केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या पथकाने माऊली मीना बाजार येथे जाऊन पाहणी केली. त्यात नियमाचे भंग होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्या प्रकरणी माऊली एकता मीना बाजार व्यवस्थापक चंद्रभूषण प्रेमराज गजभिये यांच्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
हेही वाचा: ब्रम्हपुरी: चिखलगाव - लाडज पुलासाठी 12 कोटी रूपये
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.