Milind Teltumbde: मिलिंद तेलतुंबडे (नक्षलवादी ) यांनी जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध

गडचिरोली – महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने १४ नोव्हेंबर या दिवशी केलेल्या धडक कारवाईत मारला गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे  ( कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडे ठार या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्याकडे बरेच अधिकार होते, तसेच पैशांचे व्यवहारही त्याच्याकडेच होते. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला असून त्यांनी या पैशांची शोधाशोध चालू केली आहे. ( 
Naxals search for money buried by Milind Teltumbde )

त्याने चळवळीचे कोट्यवधी रुपये भूमीच्या खाली गाडून ठेवल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली आहे; मात्र हे ठिकाण घनदाट अरण्यात नेमके कुठे आहे ?, ते नक्षलवाद्यांना ठाऊक नाही. पैसा नेमका किती आहे ?, याचाही अंदाज नाही. हा पैसा जर सापडला नाही, तर नक्षलवादी चळवळीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडे ठार )

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.