Chandrapur News: शेतमजूराचा असाही वाढदिवास साजरा, धान पुंजन्याचा सोफा अन स्टूल, पुंजन्यावरच कापला केक | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,शेतमजूराचा असाही वाढदिवास साजरा, धान पुंजन्याचा सोफा अन स्टूल, पुंजन्यावरच कापला

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,शेतमजूराचा असाही वाढदिवास साजरा, धान पुंजन्याचा सोफा अन स्टूल, पुंजन्यावरच कापला
पुंजन्यावरच कापला केक  - News File Pic

Chandrapur News: वाढदिवस म्हणजे आनंदाला उधान आणणारा दिवस. एखाद्या हॉटेलात , निसर्गरम्य स्थळी मित्रांचा सोबतीने वाढदिवस करण्याची हौस कुणाला नाही. मात्र सध्या हमखास मजूरी मिळण्याचे दिवस. अश्यात कसला वाढदिवस. मात्र सहकार्यांना वाढदिवस असल्याची माहीती मिळताच त्यांनी थेट धानाचा पुंजन्यावर केक ठेवला. बसायला धान पुंजन्याचा सोफा अन स्टूल. हा आगडावेगडा वाढदिवस गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वढोली येथिल सूनिल कोहपरे यांच्या शेतात बघायला मिळाला. अवकाळी पावसामुळे हमखास मिळणारी मजूरी मिळेनाशी झाली. 

ज्या शेतकऱ्यांचे धान कापलेला आहे, असे शेतकरी लगबगीने धान पुंजने गोळा करीत आहेत. वढोली येथे धान कापायला गेलेल्या अतूल आत्राम याचा आज वाढदिवस होता. लक्षात अतुलचे सहकारी शेतमजूरांनी थेट शेतातच केक बोलाविला. केक ठेवायला स्टूल नाही की अतुलला बसायला खुर्ची नाही. 

हे नक्कीच वाचा: मिलिंद तेलतुंबडे (नक्षलवादी ) यांनी जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध

मग काय शेतमजूरांनी धान पुंजन्याचा बांध्यानी सोफा आणि स्टूल बनविला. याच स्टूलवर ठेवून अतुलने केक कापला. यावेळी शेत मालक सूनिल कोहपरे हजर होते. केक कापतांना अतीरचा चेहऱ्यावर स्मित हास्य आले. कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलात बसल्यावर असा आनंद मिळू शकेल .


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.