Chandrapur News: सरकार चालविण्यासाठी आम्ही त्याग केला मात्र आम्ही वारंवार त्याग करणार नाही | Batmi Express

Be
0

आम्ही वारंवार त्याग करणार नाही - News File Pic

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज  जिल्ह्यातील मूल येथील पहिल्या जाहीर सभेत काँग्रेसबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मूल येथे तालुका क्रीडा संकुल मैदानावर बोलताना त्यांनी आगामी निवडणूकीत मित्रपक्षांकडून जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे संकेत दिले. त्यांच्या मते तिकीट वाटप करतांना निवडणुकीत आणि सरकार चालविण्यासाठी आम्ही त्याग केला मात्र आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजासकट त्या त्यागाची किंमत वसूल करू असेही पवार म्हणाले. 

हे नक्कीच वाचा: मिलिंद तेलतुंबडे (नक्षलवादी ) यांनी जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात दौरा करताना 'राष्ट्रवादीचे दुकान बंद करू' अशी भाषा केली होती. त्याला पवारांनी दिलेले उत्तर समजले जात आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->