'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur News: नागपूर १०वी च्या विद्यार्थिनीशी स्कूल व्हॅलचालकाची सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि… | Batmi Express

0

नागपूर १०वी च्या विद्यार्थिनीशी स्कूल व्हॅलचालकाची सलगी,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,crime Nagpur,Nagpur Crime,Rape,
नागपूर १०वी च्या विद्यार्थिनीशी स्कूल व्हॅलचालकाची सलगी

नागपूर (Nagpur) :
  तो 21 वर्षांचा रोज स्कूल व्हॅननं तिला घ्यायला यायचा. ती 15 वर्षांची त्याच्या गाडी बसून शाळेत जायची. तो तिच्यासाठी व्हॅनमध्ये जवळ जागा देत होता. दोघांचेही सूत जुळले. तो एक दिवस तिची आई नसताना तिला भेटायला घरी आला. पण, आई अचानक घरी आल्यानं दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. शेवटी मुलीच्या आईने त्याच्याविरोधात सक्करदरा पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली.

सावनेर येथील निखिल आत्राम असं आरोपीचं नाव आहे. सक्करदरा येथील मोना (काल्पनिक नाव) दहावीत शिकते. निखिल हा स्कूल व्हॅन चालवितो. तो नागपुरात आपल्या मामाकडे राहतो. स्कूल व्हॅन चालवितो. गेल्या दोन वर्षांपासून तो मोनाला शाळेत सोडून द्यायचा. ती त्याला आवडायला लागली.

हे नक्कीच वाचा: मिलिंद तेलतुंबडे (नक्षलवादी ) यांनी जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध

इतर मुलांना घरी सोडून दिल्यानंतर मोनाला शेवटी घरी पोहचवून द्यायचा. व्हॅन चालविताना तिच्याशी बोलत असायचा. दोन-तीन महिन्यांत त्यांच्यात आकर्षण निर्माण झाले. तीसुद्धा त्याच्यावर प्रेम करून लागली. कधी-कधी ती शाळेला बुट्टी मारून फिरायला जायची. दरम्यान, कोरोनामुळं दोघांचं भेटणं कमी झालं. एक दिवस तो मोनाला भेटायला चक्क घरी आला. मोनाची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. पण, घराशेजारच्या महिलेनं तिला फोन केला. तुमच्या घरात अनोखळी व्यक्ती शिरला असून दरवाजा आतून बंद असल्याचं सांगितलं. त्यामुळं मोनाची आई लगबगीनं घरी आली. तेव्हा ते दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. मोनानं त्याचीच बाजू घेतली. पण, आईच्या आग्रहास्तवर त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. निखिलला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली.

कळमन्यात वाहनचालका विरोधात बलात्काराचा गुन्हा:

कळमना घटनेतील आरोपी मनीष पराते हा 45 वर्षांचा आहे. तो वाहनचालक असल्यानं कधी घरी यायचा, तर कधी रात्री बाहेरच राहायचा. त्यामुळं चार घरे बाजूला असलेली 14 वर्षांची मुलगी त्याच्या पत्नीसोबत झोपायला यायची. याचा गैरफायदा मनीषनं घेतला. तिच्यावर अत्याचार केला. पण, तिनं ही बाब घरच्यांना सांगितली नाही. मासिक पाळी चुकल्यानं तिच्या आईला शंका आली. तिची तपासणी केल्यानंतर ती चार महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. पीडितेच्या तक्रारीवरून मनीषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (जे) भादंवि सहकलम ४, ८, १२ पोक्सो अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×