मुंबईतील ऑटोमोबाईल कंपनीला भीषण आग - File Pic |
मुंबईतील पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. (A Fire broke out at an automobile company in Mumbai )
शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर भीषण आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.