'
30 seconds remaining
Skip Ad >

भामरागड - नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ... | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,भामरागड - नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची
नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ - News Pic

भामरागड
:- तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या कोठी ते मुरमभुशीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम सुरु असतांना नक्षल्यांनी दोन ट्रक्टरची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.१३ नोव्हेंबर रोजी गयारापत्ती मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेन्ट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा ( कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडे ठार पोलिसांनी खात्मा केला होता. ( Naxals set fire to two tractors )

त्याच पार्श्वभूमीवर तीन दिवसाआधी पत्रके टाकून २७ नोव्हेंबर रोजी बंद चे आवाहन केले होते. आणि त्याच दरम्यान पोलीस मदत केंद्र कोटी अंतर्गत मरकणार ते मुरूमभुशी रस्त्याचे विकासकाम कंत्राटदार अखिलेश मिश्रा यांच्या मार्फत काम सुरु असल्याने चवताळलेल्या नक्षल्यांनी दमदाटी करीत दोन ट्रक्टरला आग लावून जाळपोळ केली आहे.

सदर घटना उघडकीस आल्याने नक्षलग्रस्त भागात असलेल्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कोटी पोलिसांना माहिती प्राप्त होताच आज सकाळी घटनेस्थळी रवाना झाले असून अधिक तपास करीत असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×