आरमोरी - महिलेवर केले कुऱ्हाडीने वार
आरमोरी – आरोपीने केले महिलेवर कुऱ्हाडीने वार, महिला गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू, आरोपीला पोलिसांनी अटक करून तीन दिवसांचा घेतला पीसीआर, सविस्तर वृत्त असे की, अंदाजे सहा वाजताचे दरम्यान २५/११/२०२१ रोजी रात्री दिनांक दरम्यान यातील फिर्यादी नामे सुलोचना अशोक वाघाडे वय ३० वर्षे राहणार पालोरा पटाची दान ता. आरमोरी ही तिचे घराचे बाजुला भासरा देवेंद्र वाघाडे यांचे घराजवळील बोरींगजवळ असलेल्या चुलीवर काम करीत असतांना आरोपी शालीकराम वाघाडे हा घराच्या मागुन हातात कु – हाड घेवुन आला व जुने भांडे विकल्याचे कारणावरून भांडण केला व त्याचे हातातील कु – हाडीने फिर्यादीस जिवानीशी ठार मारण्याचे उददेशाने कु – हाडीचे धारदार पात्याकडुन तिचे डाव्या बाजूचे खांदयावर व डावे कानाखाली मारून गंभीर जखमी केले . फिर्यादीला पोलीस पाटलांनी उपचाराकरीता सरकारी दवाखाना आरमोरी येथे उपचार करीता भरती केले.
हेही वाचा: भामरागड - नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ...
फियादीचे बयाणावरुन सदरचा गुन्हा कलम ३०७ भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला . सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयातील घटणास्थळ पंचनामा करून आरोपीस अटक केली व तीन दिवसांचा पीसीआर घेऊन अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.