26 नागरिकांना मिळाला उज्वला योजनेचा लाभ
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे सचिव चंदन पाल यांनी शास्त्रीनगर प्रभागातील 26 नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला गॅस ( Ujwala Yojana ) योजनेचा लाभ महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मिळवून दिला त्यानिमित्ताने लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम नेहरू नगर येथील समाज भवनात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. .
हे नक्कीच वाचा: औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
त्यांनी यावेळी सांगितले की उज्वला गॅस ( Ujwala Yojana ) योजनेचे महिलांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान असून धूर मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करणारी ही योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर उपमहापौर राहुल पावडे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले तसेच 160 नागरिकांच्या श्रमिक कार्डची व 120 मतदान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.
चंद्रपूर - महिलांच्या सक्षमीकरणात उज्वला गॅस योजनेचे मोठे योगदान |
सदर कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे,बंगाली आघाडी अध्यक्ष दिपक भट्टाचार्य,नगरसेविका वनिता डुकरे,मंडळ महामंत्री,मनोरंजन रॉय,राम हरणे,महानगर सचिव रवी जोगी,सारिका संदूरकर,सतीश तायडे,बंगाली आघाडी महामंत्री कृष्णा कुंडू,शंकर सुडीत,उमेश गजर, अनुप देवना,प्रशांत बोबडे, आशु रॉय,राज सोनू, उमेश साळुंखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती....
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.