Nagpur News: ‘ती’ का बोलत नाही म्हणून भेटायला बोलावलं, वाद झाला अन् झाडली गोळी, पण… | Batmi Express

nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Nagpur,crime in nagpur,Nagpur LIve News,Nagpur LIve,

nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,crime in nagpur,Nagpur LIve News,Nagpur LIve,
 ‘ती’ का बोलत नाही म्हणून भेटायला बोलावलं, वाद झाला अन् झाडली गोळी, 

नागपूर (Nagpur) :
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Nagpur Government Medical College and Hospital) परिसरामध्ये आज अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका शिकाऊ महिला डॉक्टरवर  तिच्या प्रियकराने  बंदूक रोखली व तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण, निशाणा चुकल्यामुळे या महिला डॉक्टराचा जीव थोडक्यात बचावला. 

हे नक्कीच वाचा: औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या ई-लायब्ररी परिसरामध्ये घडली. विक्की चकोले असं या विकृत प्रियकर आरोपीचं नाव आहे. शिकाऊ महिला डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून बोलणे टाळत असल्यानं संतापलेल्या विक्कीने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले. दोघे जण चर्चा करत असताना अचानक वाद झाला. याच दरम्यान त्याने बंदूक बाहेर काढीत गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्याने अनर्थ टळला.

हे नक्कीच वाचा: वडसा रेल्वे रेल्वेस्टेशनच्या जवळील रूळावर तरुणाने केली आत्महत्या 

मिळालेल्या माहितीनुसार, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बीपीएमटी) अभ्यासक्रम पूर्ण करून १ वर्षाची सेवा देणाऱ्या इन्टर्न डॉक्टरची एका युवकाशी असलेली मैत्री चार महिन्यांपूर्वी तुटली. दरम्यानच्या काळात त्याने इन्टर्न डॉक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तिने त्याला टाळले. सोमवारी सायंकाळी तो मेडिकलमधील अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई-लायब्ररी समोर आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. काही कळण्याच्या आत त्याने खिशातून बंदूक काढली आणि तिच्यावर झाडली. परंतु नेम चुकला. तिने आरडाओरड करून मदत मागितली. आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांनी धाव घेतली. परंतु तो पळून गेला.

या प्रकरणी या तरुणीने अजनी पोलिसांना याची माहिती दिली. पहिल्यांदा मेडिकलमध्ये डॉक्टरवर गोळी झाडण्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. गोळी झाडली गेली की गोळी बंदुकीतच अडकून राहिली, याबाबत अद्याप संभ्रम असल्याचेही पुढे येत आहे. या संदर्भात अजनी पोलीस ठाण्या हत्तेच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विकी चकोले फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.