वडसा रेल्वे रेल्वेस्टेशनच्या जवळील रूळावर तरुणाने केली आत्महत्या |
Wadsa Suicide News / देसाईगंज: वडसा रेल्वेस्थानकातून सुटलेल्या गोंदिया – बल्लारशहा या पॅसेंजर रेल्वेगाडीसमोर स्वत : ला झोकून देत एका युवकाने आत्महत्या करण्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव कार्तिक प्रदीप भंडारी ( रा. आरमोरी , वय २२ ) अस आहे. वडसा येथील बायपास रेल्वे फाटक ते हेटी यादरम्यान असलेल्या रेल्वेरुळांवर ही घटना सकाळी घडली.
(young-man-commits-suicide-on-track-near-wadsa-railway-station )
रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळाजवळच त्याची मोटारसायकल उभी होती. गाडीतील पेट्रोल टाकीमधून पेट्रोल काढून खिशातील व सोबत असलेली कागदपत्रे, यात बँक पासबुक, खिशात असलेल्या १० पासून १०० रुपयांपर्यंतच्या नोटा त्या ठिकाणी जाळलेल्या होत्या. काही भाग न जळालेल्या कागदपत्रावरून ओळख स्पस्ट झाली. सदर युवकाला गाडीची नियोजित वेळ माहीत असावी. त्यानुसारच त्याने तिथे पोहोचून कागदपत्रांची जाळपोळ आधी केली. त्यानंतर वडसा रेल्वे स्टेशनवरून गाडी ( गोंदिया – बल्लारशहा पॅसेंजर ) सुटल्यानंतर तो सज्ज झाला आणि गाडी जवळ येताच त्याने स्वतःचे शरीर रुळांवर ठेवले. त्यामुळे त्याच्या शरीराचे तूकडे झाले. तरुणाने आत्महत्या का केली याच कारण सध्या अपस्टच आहे.