'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यात चार वर्षीय चिमुकलीला भरलेल्या विहिरीत फेकले, पण... | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Rape,Chandrapur Live,Rape News,Chandrapur News IN Marathi,Gondpipari,चार वर्षीय चिमुकलीला भरलेल्या विहिरीत फेकले,
गोंडपिपरी तालुक्यात चार वर्षीय चिमुकलीला भरलेल्या विहिरीत फेकले, पण...

गोंडपिपरी
:- वडील कामावर आणि आई घरात काम करीत असताना चार वर्षीय चिमुकली घोडागाडीवर खेळत होती. अशातच गावातील एक १६ वर्षीय वेडसर तरुण तेथे आला आणि घोडागाडीची मागणी करू लागला. मात्र, चिमुकलीने नकार देताच रागाच्या भरात त्याने त्या चिमुकलीला चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. विहिरीतील पाईपचा आधार घेत चिमुकलीने आरडाओरड करताच आसपासच्या लोकांनी तिला बाहेर काढले व चिमुकलीचे प्राण वाचले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ गावात घडल्याची माहिती बुधवारी उजेडात आली.

हे नक्कीच वाचा: औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पलक विकास गुडपल्ले (वय ४), रा. खराळपेठ असे या चिमुकलीचे नाव आहे. दैनंदिन नित्यक्रमाने विकास गुडपल्ले हे आपल्या कामावर गेले असताना त्यांची पत्नी ही घरातील कामे आटोपत होती. चार वर्षीय पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील तरुण अनिकेत भोयर हा तेथे आला आणि पलकला 'घोडागाडी मला दे' अशी मागणी करू लागला. मात्र पलकने अनिकेतला नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले.

हे नक्कीच वाचा: वडसा रेल्वे रेल्वेस्टेशनच्या जवळील रूळावर तरुणाने केली आत्महत्या 

विहिरीत पडताच पलकने विहिरीतील पाईपला पकडून आरडाओरड सुरू केली. पलकच्या जोराने ओरडण्याचा आवाज येताच आसपासच्या लोकांनी धाव घेतली. अथक प्रयत्नातून तिला बाहेर काढले. तिचे प्राण वाचविले. एकंदरीत या संपूर्ण घटनेचा थरार बघता उपस्थित अनेकांची भंबेरी उडाली असून, ही घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता अनिकेत भोयर हा वेडसर तरुण असून मनोरुग्ण असल्याने याबाबत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली नाही आहे. तर घटनेत पलकला किरकोळ जखमा झाल्या असून तिला उपचारांकरिता रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×