'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर - औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | Batmi Express

0

चंद्रपूर - औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Rape,Rape News,
औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चंद्रपूर
:- कितीही जनजागृती केली तरी महिला अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रोज म्हटलं तरी महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असाच एक भयंकर प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. मेडिकलमधून औषधी घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.  ( Rape of a minor girl who went home with medicine )

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात घुग्घुस पोलीसांनी वणी येथील आरोपी राजेश समय्या सब्बनवर (56) याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांचा माहीतीनुसार, औषध घेण्यासाठी घुग्घुस येथील अल्पवयीन मुलगी मेडीकलमध्ये गेली होती. औषध घेऊन ती निघाली असता आरोपी राजेश सब्बनवार याने तिला थांबवले. वाहनावर बसण्याचा त्याने आग्रह धरला. ती विश्वाने बसली मात्र, आरोपीने चंद्रपूर रस्त्यावरील अंतुर्ली फाट्यावर वाहन थांबवले अन् तिच्यावर अत्याचार केला.

हे नक्कीच वाचा: वडसा रेल्वे रेल्वेस्टेशनच्या जवळील रूळावर तरुणाने केली आत्महत्या 

ती विनवनी करत होती. मात्र, वासनेने आंधळा झालेल्या आरोपीनी तिच्यावर बळजबरी केली. या प्रकाराची तक्रार अल्पवयीन मुलीने घुग्घुस पोलीस स्टेशनला केली. तक्रारीवरून पोलीसांनी राजेश समय्या सब्बनवारला बुधवारी सायंकाळी अटक केली. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मेघा गोखरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×