Nagpur Crime: झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पतीने फेकले उकळते तेल... | बातमी एक्सप्रेस नागपूर

Nagpur,Nagpur Crime,nagpur news,crime Nagpur,crime in nagpur,nagpur marathi news

Nagpur,Nagpur Crime,nagpur news,crime Nagpur,crime in nagpur,nagpur marathi news
Nagpur Crime: झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पतीने फेकले उकळते तेल

Nagpur Crime: 
नागपूरमधील एका व्यक्तीने स्वत:च्या झोपलेल्या पत्नीच्या अंगावर उकळते तेल फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूध्द हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नागपूरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशीलनगर परिसरात घडली आहे. भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे पतीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भावनाचे काही दिवसांपासून कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय पती सतीश भिमटेला होता. या कारणावरून भावना आणि सतीश याच्यात अधूनमधून वाद होत होता. आदल्या दिवशीही याच्यात किरकोळ वाद झाला होता. याच दरम्यान शुक्रवारी रात्री भावना आणि सतीश दोघेही घरात झोपले होते. त्यानंतर सतीश आज शनिवारी पहाटेच झोपेतून उठला. 

हे सुद्धा वाचा: ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.! तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह 

भावना झोपलेले पाहून त्यांने कढईत तेल गरम करून तिच्या अंगावर उकळ‌ते तेल ओतले. यानंतर भावनाच्या हात, पायांना भाजल्याने तिला दनाखान्यात तातडीने दाखल केले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरानी दिली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूध्द प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.