Chandrapur Corona Latest News |
Chandrapur Corona: मागील 24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यू संख्या शून्य आहे. (Chandrapur Corona Latest News)
हे सुद्धा वाचा: ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.! तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 3, बल्लारपूर 3, रुग्ण आढळले असून चंद्रपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, चंद्रपूर, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 808 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 242 झाली आहे. सध्या 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 27 हजार 291 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 37 हजार 64 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
हे सुद्धा वाचा: Nagpur Crime: झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पतीने फेकले उकळते तेल
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.