अबब... शिक्षक नव्हे हा तर राक्षस - सातवीतल्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून गुरुजींनी इतक मारलं की... | बातमी एक्सप्रेस

crime news,Crime,Crime Latest News,शिक्षक नव्हे हा तर राक्षस - सातवीतल्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून गुरुजींनी इतक मारलं की
crime news,Crime,Crime Latest News,शिक्षक नव्हे हा तर राक्षस - सातवीतल्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून गुरुजींनी इतक मारलं की
शिक्षकाने मुलाला इतकं मारलं की मुलाचा मृत्यू झाला.

एका सातवीच्या विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून संतापाच्या भरात शिक्षकाने मुलाला इतकं मारलं की मुलाचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जयपूर :  राजस्थानच्या (Rajasthan) चुरु जिल्ह्यात एका शिक्षकाने (Crime) भयानक प्रकार केल्याचं समोर आलं आहे. एका सातवीच्या विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून संतापाच्या भरात शिक्षकाने मुलाला इतकं मारलं की मुलाचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच सरकारने शाळेवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद दोतसरा यांनी शाळेची मान्यता स्थगित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Teacher Beaten Up Student For Not Completing Homework) 

सालासर पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप बिष्णोई म्हणाले की, तेरा वर्षांचा हा एका खासगी शाळेत इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल शिक्षकाने त्याला मारलं. नंतर मुलाला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की आरोपी शिक्षक मनोज याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा म्हणाले की, कोळसर गावात एका इयत्ता सातवीच्या मुलाचा खासगी शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची दुःखद बातमी आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत शाळेची मान्यता स्थगित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे डोटासरा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.