Chandrapur News: जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास आज परवानगी | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News: जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास परवानगी

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News: जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास परवानगी

Chandrapur News:
 
शासनाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज, मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधिन राहून दि. 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जारी केले आहे. ( 
Permission to start amusement parks and industries in the district today )

हि पण बातमी वाचा: चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार?

या आदेशानुसार जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज दि. 22 ऑक्टोंबर 2021 पासुन सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. या आदेशाद्वारे फक्त मोकळया जागेतील कोरडया राईड्ससाठी परवानगी देण्यात येत असून यामध्ये पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई आहे.

हि पण बातमी वाचा: मागील 24 तासात जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह 

या  आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या आदेशात नमूद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.