Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार? | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार?,बातमी एक्सप्रेस चंद्रपूर,मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई ,Chandrapur Live,Chandrapur News,

चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार?,बातमी एक्सप्रेस चंद्रपूर,मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई ,Chandrapur Live,Chandrapur News,
 जिल्ह्यातील नागरिक विनामास्क बाजारपेठेत फिरतांना दिसतात - File Pic

चंद्रपूर वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही आहे. पण आताही जिल्ह्यात, तालुक्यात व गावातील अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. जिल्ह्यातील नागरिक विनामास्क बाजारपेठेत फिरतांना दिसतात आणि एवढेच नाही तर दुचाकी वाहन चालक सुद्धा विनामास्क फिरतांना दिसतात ही बाब अतिशय घातक आहे.  त्यामुळे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी. ( When will action be taken against those without masks in Chandrapur district? ) 

हि पण बातमी वाचा: अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ?

जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने द्वारा वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने करण्यात आले आहे.

हि पण बातमी वाचा: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.