'
30 seconds remaining
Skip Ad >

अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ? | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

0

अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह, बातमी एक्सप्रेस गडचिरोली,body of a 15-year-old girl was found in a bid at Amirza ,Gadchiroli News,Gadchiroli Marathi News
घातपात की आत्महत्या ? 

गडचिरोली
: गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बोडीत ( छोटा तलाव ) आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे त्या मुलीचे आई – वडील मजुरीसाठी वर्धा जिल्ह्यात गेले असताना ही घटना घडली. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशातून झाला , याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.  ( body of a 15-year-old girl was found in a bid at Amirza )

हि पण बातमी वाचा: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार , किरण सुनील चंदनखेडे ( १५ वर्ष ) असे त्या मृत मुलीचे नावआहे. ती नवव्या वर्गात शिकत होती तिचे आई – वडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले होते. घरात तिची आजी आणि लहान भावासह ती राहात होतीदरम्यान , १५ ते १६ च्या दरम्यान ती घरी आलीच नाही. त्यामुळे १६ ला किरणच्या काकांनी तिच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान तिचे आई – वडील गावी पोहोचल्यानंतरशोधाशोध करण्यात आली; पण तिचा थांगपत्ता लागला नाही.

रविवारी दि .१७ ) गडचिरोली पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी गावातील गुराखी वसंत नन्नावरे तिकडे शौचास गेला असताना त्याला किरणचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. 

हि पण बातमी वाचा: बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू

हा घातपात आहे की आत्महत्या ? आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणातून ? तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कोण ? घातपात असेल तर कोणी तिला मारले ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत .

व्हिडिओ शुटींगमध्ये पंचनामा पोलिसांनी व्हिडिओ शुटींग करत घटनास्थळी पंचनामा केला. नंतर मृतदेह बाहेर काढून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या चमूने सायंकाळी शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि तिच्या अंगावर मार लागल्याच्या काही जखमा आहेत का , हे कळू शकेल पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×