अमरावती (Amravati). धारणी ते लवादा मार्गावर झालेल्या अपघातात जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी मित्रानेच त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी मित्रानेच हा घात केल्याचे तपासात उघड झाले आहे. बेशुद्धावस्थेत मित्र मृत पावला तर आपल्याला तुरुंगात जावे लागेल या भीतीपोटी चक्क मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची घटना तपासात समोर आली आहे.
पोलीसी सूत्रांकडून पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार, धारणीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे जेव्हा आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी मोक्याची पाहणी केली, अज्ञात मृतकाच्या शवाची ओळख पटवून घेतली. तेव्हा असे लक्षात आले की, मृतक हा बासपाणी या खेड्याचा रहिवासी असून त्याचे नाव अन्ना गंगाराम धान्डे ( २८) आहे. सदरचा मृतदेह हा अपघातग्रस्त नसून हत्येस अपघाताचा बागूलबूवा केल्याचा संशय आढळुन आला. त्याचबरोबर मृतदेहाजवळ अपघातग्रस्त दुचाकीचे तुटके फुटके काही भाग घटनास्थळी तपास अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यानंतर धारणी पोलीसांकडून उत्तरीय तपासणीसाठी शव धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून लगेच प्रकरणाचे गांभीर्य बघून ओळखून अमरावती येथून डॉगस्कॉटचे पाचारण करण्यात.
हि पण बातमी वाचा: अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ?
डॉगस्कॉटच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत अपघातग्रस्त घटनास्थळ व त्यानंतर मृत्यूमागील खरा तिळा सोडविण्यात आला. मृतकाचा जीवलग मित्र रमेश ऊर्फ सुरेश दारशिंबे यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले, तपास अधिकाऱ्यांपूढे सुरेश दारशिंबेकडून मृतकाच्या मृत्यूमागे लपलेले कथानक वजा कबूलनामा समोर आला थक्क करणारा ठरला आरोपीच्या कबूलनाम्यानुसार मृतक अन्ना धान्डे आणि आरोपी सुरेश दारशिंबे हे दोघे जिवलग मित्र असून घटनेच्या दिवशी दोघेही अपघातग्रस्त दुचाकीने धारणी ते परतवाडा यादरम्यान प्रवास करित होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीची चैन बिघडली व अपघात घडला यामध्ये डोक्यावर गंभीर दुखापत होवून तो बेशुद्ध व मरणासन्न अवस्थेत होता.
यादरम्यान जर मृतक शुद्धीवर न आल्यास आपल्यास जेल होणार म्हणून मी स्वतः मृतकास रस्त्याच्या कडेवरून उचलून जंगलात नेले, मृतकाच्या अंगावचा शर्ट काढून त्याला त्याच्याच शर्टाने गळा आवळून गळफास दिला. इतकंच नव्हे तर एका दोरीने मृतकाच्या गुप्तांगास देखील दोरीने घट्ट बांधून त्याचा जीव जाईपर्यंत बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतकाची ओळख पटवून घेता येऊ नये म्हणून ओळख लपविण्यासाठी आरोपी रमेश उर्फ सुरेश याने स्वतः मृतकाच्या हातावर लिहिलेल्या नावाला दगडाच्या साह्याने मिटविण्याचा देखील प्रयत्न केला असा कबूवनामा स्विकार केला आहे.
हि पण बातमी वाचा: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
त्याआधारावर धारणी पोलीसांकडून सदरचा गुन्हा दाखल करित आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असुन पुढील तपास अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, मेळघाटचे परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी गोहर हसन, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते हे करित आहेत. बातमी लिहीपर्यंत मृतकाच्या शवाची उत्तरीय तपासी उरकून सदरचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आहे. मात्र, अध्यापही तपास अधिकाऱ्यांचे समाधान झाले नसून तपास गुंता कायम आहे. मृत्यूमागील लपलेले रहस्य आणि सुरेश दारशिंबे याने दिलेला कबूलनामा यात बरीच तफावत दिसून येत असल्याने सुरेश व्यतिरिक्त एकापैक्षा अधिक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसून त्या दृष्टीकोणातून अधिक सजग व अत्यंत बारकाईपूर्वक सदरचा तपास तपासी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.