ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.! तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Chandrapur,Bramhapuri,suicide,Chandrapur News,ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.! तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह

Chandrapur,Bramhapuri,suicide,Chandrapur News,Bramhapuri News,suicide news,
ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.!

ब्रम्हपुरी
:- तालुक्यातील रणमोचन येथील लंकेश दिघोरे वय (२६) या युवकाने ब्रम्हपुरी आरमोरी रोड वरील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास घडली असून सदर युवकांवर मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावात असल्याचे बोलल्या जात आहे  सदर युवकानी स्वतःची पल्सर मोटार सायकल वैनगंगा नदीवरील पूलावर आढळून आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र दोन दिवसानंतर त्याचा अखेर मृतदेह ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे .

हे सुद्धा वाचा: अबब... शिक्षक नव्हे हा तर राक्षस - सातवीतल्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून गुरुजींनी इतक मारलं की...

प्राप्त माहिती अशी की सदर युवक गांगलवाडी टी पॉईंट जवळील पाचगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर नोकरी करीत होता सदर व्यक्ती  दोन ते तीन वाजेच्या  च्या आसपास घरून ड्युटीवर निघून गेला मात्र नेहमीच्या वेळेप्रमाणे घरी  न परतल्याने  कुटुंबातील लोकांनी लंकेशच्या मोबाईल फोन केला मात्र तो स्विच ऑफ दाखवत असल्याने घरच्यांची आणखी चिंता वाढली कालांतराने काही व्यक्तींना त्याची पल्सर नावाची मोटार सायकल वैनगंगा नदी पुलावर असल्याचे सांगितले लगेचच घरच्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ती त्याचीच मोटरसायकल असल्याचे लक्षात आले त्यानंतर ब्रम्हपुरी ठाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार करण्यात आली व दोन दिवसापासून घरच्यांनी शोध  घेतली असता सदर व्यक्तीचा मृतदेह तब्बल दोन दिवसानंतर ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडे सावली व गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आला आहे त्याच्या पश्चात पत्नी 2 महिन्याचे बाळ आई असा परिवार आहे कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या आत्महत्येने  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आत्महत्येच नेमके कारण कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.