गोंडवाना विद्यापीठ: वनस्पतीशास्त्र विभाची विद्यार्थीनी प्रणाली रविंद्र लाडे हीचे सुयश | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

Gondwana University,Education,Exam 2021,गोंडवाना विद्यापीठ: वनस्पतीशास्त्र विभाची विद्यार्थीनी प्रणाली रविंद्र लाडे हीचे सुयश

Gondwana University,Education,Exam 2021,गोंडवाना विद्यापीठ: वनस्पतीशास्त्र विभाची विद्यार्थीनी प्रणाली रविंद्र लाडे हीचे सुयश
गोंडवाना विद्यापीठ: वनस्पतीशास्त्र विभाची विद्यार्थीनी प्रणाली रविंद्र लाडे हीचे सुयश 

गडचिरोली
: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा उन्हाळी २०२१ परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यामध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभाची विद्यार्थीनी प्रणाली रविंद्र लाडे हिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे या वर्षी सुद्धा सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे.

प्रणाली रविंद्र लाडे हिने प्राप्त यशाकरिता तिचे पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शनाबद्दल आमार मानले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता वानखेडे (चौधरी) आणि समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कडून प्रणाली लाडे हिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.