महाराष्ट्र: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर - मंत्री विजय वडेट्टीवार | Batmi Express Maharashtra

Be
0

महाराष्ट्र: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर,#FARMER, #FUND, #MAHARASHTRA ,#VIJAYWADETTIWAR,Pune,Amravati,Nashik
365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर - मंत्री विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र
: राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झाली. याच पार्श्वभूमीवर, दिलासा देत आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना हा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.  ( maharashtra-state-government-has-sanctioned-crores-of-funds-for-the-affected-farmers )

Read Also: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते करून दाखवा - रक्षा खडसें

तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत तात्काळ बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे स्पष्ट निर्देश देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

 विभागनिहाय निधीचे वाटप:

  1. ▪️ पुणे : 150 कोटी 12 लाख रुपये
  2. ▪️ कोकण : 8 कोटी 51 लाख रुपये
  3. ▪️ अमरावती :118 कोटी 41 लाख रुपये
  4. ▪️ नाशिक : 1 लाख रुपये
  5. ▪️ औरंगाबाद : 77 कोटी 97 लाख रुपये
  6. ▪️ नागपूर : 10 कोटी 65 लाख रुपये 

असे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे. हा मंजूर निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना तातडीने वितरित करण्यात यावा असे निर्देश वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->