मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते करून दाखवा - रक्षा खडसें |
Jalgaon: मुख्यमंत्री नसतांना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट 50 हजार रुपये भरपाई देऊ अस आश्वासन दिलं होतं. आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत 'जे बोलले ते करून दाखवा' अशी जुनी आठवण भाजपच्या खासदार रक्षा खडसें यांनी ठाकरे यांना करून दिली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे , सरकार कडून अजून पर्यंत कोणतीच मदत मिळाली नाही, जस बोलले तस करून दाखवा , जेणे करून शेतकऱ्यांना मदत मिळेल. यामुळे खडसें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलल्या प्रमाणे वागा असा खोचक टोला मारला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.