जिवती:- जिवती तालुक्यातील चिखली बु येथे सततच्या अतितीव्र पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालच आहे. पण जिवती तालुक्यात विज पडून 25 शेळ्यांचा मृत्यू, तर दोन इसम गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( lightning-strike-killed-25-goats-on-the-spot-in-jivati)
हेही वाचा: चंद्रपूर: धक्कादायक; शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य
अश्यातच नागेश रामशाव कोटनाके (अंदाजे २१ वर्ष) व कमलबाई धर्मराव मेश्राम (अंदाजे ३९ वर्ष) यांनी आपल्याकडे असलेल्या शेळ्या चारायला नेले असता अचानक सांयकाळी 5.30 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला.
विजेच्या कडकडाटाने घाबरून आपल्या शेळ्या घराकडे जात असताना विज पडुन 25 शेळ्यांचा जागीच मृत्यु झाला. तर यात दोन जण गंभीर जखमी झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे.