रेल्वेच्या धडकेत महिला जागीच ठार |
धानोरा: परशुराम पोटेलिंगटी रेल्वे स्थानका समोर एक वृद्ध महिला रेल्वे गाडीच्या धडकेने ठार झाल्याची घटना आज दि.४ ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर व्रुत्त असे की, वणी वरुन कोळसा भरुन झरी जाननी तालुक्यातील लिंगटी मार्गे कोल्हापुर कडे जात मालगाडी जात असतांनी लिंगटी रेल्वे स्थानका लगत असलेल्या ‘नवीन धानोरा येथील रामक्काबाई देवगा पार्लेवार (८०) ही वृद्ध महिला शौचालयाकरिता रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्रॉसिंग करत असतांना मार्गावर धावणाऱ्या केएसएनके या कोळसाच्या मालगाडीची जब्बर धडक बसल्याने ती रेल्वे रुळाच्या बाजूला फेकल्या गेली. हेही वाचा: चंद्रपूर: धक्कादायक; शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य
त्यात तिच्या डोक्याला जबर मार लागून ति जागीच ठार झाली. त्या महिलेला कमी ऐकाला येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहेत. रेल्वे चालकाने अतिदक्षता दाखवून गाडी हळूहळू करून वार्वार हॉर्न देत असतांना, वृद्ध महिलेकडून कुठलाच प्रतिसात मिळाला नाहीत. हेही वाचा: पुणे: IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार; चक्क आरोपीच्या बहिणीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं!
रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिला ठार झाल्याची माहिती मिळताच गांवातील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिवाय रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिसांना माहिती देऊन पाचारण करण्यात आले होते. म्रुतक व्रुद्ध महिलेचा अंतिम संस्कार तिच्या गावी नविन धानोरा तेथे सायंकाळी पार पडल्याची माहीती मिळाली आहे.