'
30 seconds remaining
Skip Ad >

पुणे: IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार; चक्क आरोपीच्या बहिणीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ! - Batmi Express Pune

0

IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार,25 वर्षीय युवतीवर बलात्कार,,Pune News,Pune News,Pune Rape News,Marathi News,NewsPune Crime  News
IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार

पुणे:
- पुण्यातील कोथरूड परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणीवर PSI पदावरील पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं आपलं पहिलं लग्न लपवून ठेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


प्रवीण नागेश जर्दे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी जर्दे हा सध्या येरवडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला पुणे शहर आणि आसपासच्या विविध ठिकाणी नेत जबरदस्तीने अनेकदा बलात्कार केला आहे. पीडित तरुणीनं आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हेही वाचा: नगर: खळबळजनक; उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने केली आत्महत्या 


संशयित आरोपी प्रवीण जर्दे याची 2018 साली पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. मे 2020 मध्ये एका गुन्ह्याचा तपास करत असताना, एका आरोपीच्या बहिणीसोबत जर्दे याची ओळख झाली होती. आरोपीनं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत फिर्यादीशी ओळख वाढवली. तसेच तिला लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×