चंद्रपूर: धक्कादायक; शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य - Batmi Express Chandrapur

Be
0

Chandrapur News,Chandrapur Crime,Marathi News,News,Latest News in Marathi,Chandrapur Marathi News,Batmi Express,मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्ल
मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य

चंद्रपूर
:- महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, आजपासून शाळा सुरू होताच, बल्लारपूर येथील तुकूमच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. 

हेही वाचा: पुणे: IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार; चक्क आरोपीच्या बहिणीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं!

बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती वर नियंत्रण मिळवले. मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे, पोलीस पोहोचले नसते तर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला चांगलेच धारेवर धरले असते. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने फक्त काही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत पोहचले होते, ती विद्यार्थी 5 वी मध्ये शिकत आहे, मुख्याध्यापकाने असे अमानुष कृत्य करून गुरूच्या नावाची घाण करण्याचे काम केले आहे. 

हेही वाचा: नगर: खळबळजनक; उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने केली आत्महत्या 

मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठवल्यानंतर, त्या मुलीच्या गुप्तांगाला हात लावल्याने विद्यार्थ्यांनी निषेध केला, व पालकांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळतास विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मुख्याध्यापक यांना खोलीत बंद करून पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर, पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली, बल्लारपूर पोलिसांचे एपीआय रमीज मुलाणी, एपीआय विकास गायकवाड, एपीआय शैलेंद्र ठाकरे, चंद्रकांत चंदे, रणविजय सिंह ठाकूर इ. पोलीस पथकाने उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले.पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->