सोयाबीन कापनीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन पलटून मोठा अपघात |
सावली : तालुक्यातील साखरी येथील सोयाबीन कापनीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन पलटून अपघात झाल्याने तीन मजूर जखमी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला झाल्याची घटना काल रात्रो च्या सुमारास घडली. किशोर नकटुजी झबाडे असे अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे.सोयाबीन कापणीचा हंगाम चालू असल्यामुळे रोजीरोटी मिळविण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात वऱ्हाडात जात असतात. पण रोजीरोटी मिळविण्यासाठी जात असताना आठवडाभरात दोन घटना घडल्या आहेत. सावली जवळ गाडी पलटल्याने उपरी येथील महिला मृत्यू पावली होती तर दुसरी घटना काल ४ ऑक्टोबर रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास हरांबा येथून यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन कापणीसाठी वाहन निघाले.
हेही वाचा: चंद्रपूर: धक्कादायक; शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य
दरम्यान यवतमाळ जवळ गेले असता अचानक वाहन चालकाच्या डोळ्यावर झपकी आली आणि वाहनाचे संतुलन बिघडल्याने वाहन पलटून अपघात झाला यात तीन मजूर जखमी झाले तर एक गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या मजुरावर प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूर येथे रेफर करून आय सि यु मध्ये भरती करण्यात आले दरम्यान आज सकाळच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.